खरपुंडी ग्रामपंचायत, जि. गडचिरोली 758868968

महत्वाचे पोर्टल्स

Google Maps वर खरपुंडी पहा

खरपुंडी ग्रामपंचायत – आमच्याबद्दल

आपल्या डिजिटल पोर्टलवर स्वागत आहे

खरपुंडी हे गाव गडचिरोली शहरापासून सुमारे ६.१ कि.मी. अंतरावर वसलेले असून हे गाव आपल्या स्वच्छतेसाठी, लोकसहभागासाठी आणि विकासाभिमुख उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. गावाची लोकसंख्या सुमारे २१७३ असून त्यापैकी पुरुष १०७८ व स्त्रिया १०९५ इतक्या आहेत. खरपुंडी हे ग्रामपंचायतीच्या कार्यकुशलतेमुळे आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे तालुक्यात एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते. ग्रामपंचायत खरपुंडीने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य व ग्रामविकास या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. गावाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन स्वच्छता राखण्यात आदर्श निर्माण केला आहे. गावातील प्रत्येक कुटुंब शौचालयसंपन्न असून गाव हागणदारीमुक्त (ODF+) घोषित झाले आहे. गावात घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन अत्यंत प्रभावी पद्धतीने केले जाते. घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा केला जातो, तसेच ग्रामपंचायतीकडून नियमितपणे कचरा संकलन गाडी चालवली जाते.

संक्षिप्त माहिती

१) ग्रा.पं.अंतर्गत गावे / वाड्या

१) खरपुंडी
२) सालईटोला
३) माडेतुकुम

२) एकूण लोकसंख्या (सन २०११)

पुरुष - १०७८
स्त्री - १०९५
एकूण - २१७३

३) कुटुंब माहिती

शौचालय असलेले कुटुंब - ४३७
दारिद्र रेषेखालील कुटुंब – १६१

४) भौगोलिक माहिती

पिकाखालील क्षेत्र – ७०९.५१
ओलीत क्षेत्र – २४६.९४
कोरडवाहू क्षेत्र – ७७.२९

५) तलाव व बोड्या

मा.मा. तलाव संख्या – २
सरकारी बोडी – १

६) मुख्य पिक

भात (Rice)

७) शासकीय कार्यालये व शाळा

ग्रामपंचायत कार्यालय – १ (सदस्य – ९), शौचालय – २
जि.प. शाळा (१ ते ४ वर्ग): मुली – ४५, मुले – ५७ (एकूण – ९२), शौचालय – २
अंगणवाडी केंद्र – ३ (३ ते ६ वयोगटातील मुले – १०४, मुली – १०१)
सहकारी सोसायटी – १, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र – १
वाचनालय – १, पोस्ट ऑफिस (खरपुंडी – १, माडेतुकूम – १)

८) इतर माहिती

बचत गट संख्या – २२
पिण्याचे पाण्याचे स्रोत: नळयोजना – १६४ जोडण्या, हातपंप – २५, सरकारी विहिरी – १०, खाजगी विहिरी – ४५
जनावरांची संख्या: गुरांचे गोठे – २५०
गटारे – एकूण ३२०० मी., बंद गटारे – ५०० मी.
कचरा कुंड्या – ३०, कंपोस्ट खड्डे – ४, शोषखड्डे – ५, कचरा पेट्या – ३०
वॉटर फिल्टर व शीतपेय केंद्र – २

ग्रामपंचायतीच्या योजना

Grampanchayat Office
ग्रामपंचायत कार्यालय
खरपुंडी

आधुनिक ग्रामपंचायत

संपर्क

आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा

तक्रार

आपली तक्रार नोंदवा व निवारण मिळवा

महत्त्वाच्या लिंकस

जनसुविधेसाठी आवश्यक ऑनलाइन सेवा

ताज्या घडामोडी

बालक सभा
महिला
ग्रामसभा